आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये राग येण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते. यातून अनेक समस्या निर्माण होऊन त्याचा परिणाम आपल्या जीवनावर आणि दररोजच्या कामावर सुद्धा होतो. यासाठी राग नियंत्रणात ठेवणे खुप गरजेचे असते. यावर योगा हा सर्वाधिक चांगला उपाय आहे. कोणती योगासने केल्यावर रागावर नियंत्रण मिळवता येते, ते जाणून घेवूयात.
ही योगासने करा
१. गोमुखासन
पाय समोर आणा. दोन्ही पाय एकमेकांवर ठेवून बसा. दोन्ही हात मागे नेऊन एकमेकांशी जुळवा. डोळे बंद करुन दीर्घ श्वास घेवून सोडा. ही प्रकिया पाच वेळा करा. यामुळे चित्त स्थिर होते. मन शांत होते.
२. अट्टाहासन
हात वर नेऊन मनापासून हसावे. दिवसातून तीनदा हे असासन केल्यास रागावर नियंत्रण मिळवू शकता.
३. अब्डोमिनल ब्रीदिंग
एक हात पोटावर तर दुसरा हात छातीवर ठेवा. श्वास घेऊन पोट फुगवा आणि श्वास सोडताना पोट आत घ्या. असे पाच ते दहा वेळा करा.