आरोग्यनामा ऑनलाईन टीम – व्यायाम करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे अनेकजण सकाळी उठल्यानंतर व्यायाम करतात. पण तुम्ही जर स्विमिंग पूलमध्ये नियमित व्यायाम केला तर हे ही तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. या व्यायामाने शरीर सुदृढ होतेच, शिवाय मन शांत होऊन एकाग्रता वाढण्यास मदतही होते. खासकरून मुलांच्या शाळांना किंवा कॉलेजना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की पोहायला जाण्याचा कार्यक्रम रोजच्या दिनक्रमामध्ये आवर्जून समाविष्ट होतो. हा व्यायाम अतिशय फायद्याचा आहे. त्यामुळे हा व्यायाम करण्याचे फायदे आणि हा व्यायाम कसा करायचा हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
असा करा स्विमिंग पूलमध्ये व्यायाम –
१) तुम्ही जर स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेले तर तुम्ही थोडा वेळ पाण्यात चला कारण हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामुळे तुमचे शरीर हलके होईल आणि तुमचा सांधे दुखीचा त्रासही दूर होईल.
२) डंबेल –
तुम्ही अगोदर पाण्यात उभं रहा आणि डंबेलला तुमच्या दोन्ही खांद्याच्या समांतर रेषेत घेऊन जा. असा व्यायाम केल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे कोणत्याही आजारच आपण सहजपणे सामना करू शकतो.
३) लेग शूट्स –
यासाठी तुम्ही तुमचे तळपाय पाण्यात ठेवा आणि पाण्यात बैठका मारा. यामुळे तुमच्या पोटऱ्या मजबूत होतात आणि गुडघ्याचा चांगला व्यायाम होतो.
४) लेग किक –
या व्यायाम प्रकारात पाण्यात उभे राहू पायाला झटके द्या. असे केल्याने आपल्या पायांचा आणि गुडघ्याचा चांगला व्यायाम होईल. त्यामुळे आपल्या शरीरासाठी हा व्यायाम खूप गरजेचा आणि फायद्याचा आहे.