जेवल्यानंतर गॅसची समस्या होते का ? ’या’ 6 उपायांनी मिळवा नियंत्रण, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन- जेवल्यानंतर किंवा दिवसभरात काहीवेळा गॅस(gas) पास होत असतो. ही प्रक्रिया सामान्य असली तरी मयार्दपेक्षा जास्तवेळ होऊ लागल्यास ती त्रासदायक ठरू शकते. या समस्येपाठी मागे काही कारणे आहे. कोरोना काळात लोक घरात जास्तवेळ बसून असल्याने यामध्ये वाढदेखील झाली आहे. जास्त खाणे, अर्जीर्ण, मेदयुक्त आणि मैद्याच्या पदार्थांमुळे पोटाच्या समस्या वाढतात. गॅस पास होण्याची समस्या वाढली असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेवूयात…
असे करा कंट्रोल गॅस(gas)
1 कोल्डड्रिंक्स
कोल्ड ड्रिंक पिणे टाळा. पाणी जास्त प्या.
2 हालचाल वाढवा
शरीराची हालचाल कमी झाल्यास ही समस्या होते. पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी शरीराची हालचाल करा. व्यायाम करा, चालायला जा.
3 मादक पदार्थ टाळा
सिगारेट, ई-सिगारेट टाळा. यामुळे गॅस होण्याची समस्या उद्भवते.
4 सावकाश खा
शरीरातील जास्तीत जास्त गॅस हा हवेमुळे तयार होतो. अन्न सावकाश चावून खाल्ल्याने ही समस्या कमी होते. घाईघाईत जेवण करणे टाळा. बोलताना, एखादं काम करताना खाऊ नका.
5 च्युइंगम
दिवसभर च्युइंगम चावत असाल तर ही समस्या होऊ शकते. हे चावताना जास्तीत जास्त हवा तोंडावाटे आत जाते.
6 काही पदार्थ टाळा
साबुदाणे, स्प्राऊट्स, ब्रोकोली, कांदा, सोडा, कार्बोनेड सोडा, गहू, बटाटा असे पदार्थ कमी करा. यामध्ये गॅस तयार करणारे घटक जास्त असतात.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Comments are closed.