आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लसणातील फायटोकेमिकल्स पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनात म्हटले आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक दूर होतात. यामुळे किडनी, लिव्हरच्या समस्यांपासून रक्षण होते. तसेच प्रोस्टेट कँसर आणि कार्डिओ व्हेस्क्युलर या आजारातही फायदा होतो. यासाठी पुरुषांनी रोज झोपण्यापूर्वी भाजलेल्या लसूणाची एक पाकळी खावी. याचे फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१) यातील अॅलिसीनमुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. स्टॅमिना वाढतो.
२) शरीरातील टॉक्झिन्स दूर होतात. किडनी, लिव्हर प्रोब्लेमपासून रक्षण होते.
३) सेलेनियम, व्हिटॅमिन्समुळे स्पर्मची क्वालिटी सुधारते. फर्टिलिटी वाढण्यास मदत होते.
४) यातील अॅलसीनमुळे सेक्स हार्मोनची लेव्हल बॅलेन्स राहते. यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या होत नाही.
५) कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रणात राहते. हार्ट प्रोब्लेमपासून बचाव होतो.
६) यातील अँटीऑक्सीडेंट्समुळे मेटॅबॉलिझम वाढते. वजन झटपट कमी होते.
७) यातील अँटी कार्सिनोजिनिक एलिमेंट्समुळे प्रोस्टेट कॅन्सरपासून रक्षण होते.