आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लसूण शरीरासाठी खूपच लाभदायक आहे. कच्चा लसूण खाल्ल्यामुळे अनेक शारीरीक व्याधी दूर होतात. यामुळे बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसूणात खूप मोठी शक्ती असल्याचे आयुर्वेदानेही मान्य केले आहे. आयुर्वेदात लसूण हे एक रामबाण औषध असल्याचा उल्लेख आहे. शरीरातील जंतू नष्ट करण्याचे काम लसूण करते. लसणात सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्याने पांढऱ्या केसांवरही ते गुणकारी आहे.
तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या कुसकरून ते तेल केसांना लावल्याने केसांच्या सर्व समस्या दूर होतात. अकाली केस पांढरे झाले असतील तर या तेलाने डोक्याची मालिश नियमित अर्धा तास करावी. यामुळे केस अकाली पांढरे होत नाहीत. तसेच केस गळत असल्यास लसणाच्या पाच पाकळ्या ५० मि.लि पाण्यात वाटाव्यात. त्यामध्ये दहा ग्रॅम मध टाकून दररोज सकाळी सेवन करावे. तसेच केस गळत असल्यास ५० गॅम राईच्या तेलात एका लसणाच्या सर्व पाकळ्या टाकून मंद आचेवर शिजवाव्यात.
लसणाच्या पाकळ्या काळ्या होईपर्यंत त्या शिजवाव्यात. नंतर ते तेल गाळूण घेऊन एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. रात्री झोपताना त्या तेलाने डोक्याची मालिश करावी. या तेलाने केसांची नियमित मालिश केल्याने केस गळणे थांबतात. घरच्या घरी करता येतील असे हे सोपे उपाय असून यामुळे केसाची कोणतीही समस्या असेल तर ती दूर होण्यास मदत होते.