आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आजकाल लोकांना फळ खायलाही वेळ नसते. म्हणून लोक फळांचा ज्यूस पिण्यास प्रधान देतात. तर काही जण आवड म्हणून फळांचा ज्यूस पितात. पण तुम्हाला माहित आहे का असे काही फळ आहेत ज्यांचा दुधासोबत सेवन केल्यास आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. चला जाणून घेऊया अशा फळांबद्दल
संत्रा- मोसंबी
संत्रा आणि मोसंबी हे आंबट पदार्थ कधीच दुधात मिसळून घेऊ नये. कारण अशा फळामध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त असते आणि त्यांचा दुधातील प्रोटीनसोबत संबंध आला तर ते आपल्या शरीरासाठी धोकादायक असतो. यामुळे शरीरातली पचन क्रियेस त्रास होऊ शकतो.
फणस
दुधासोबत फणसाचाही आहारात समावेश आरोग्यास धोक्याचा ठरू शकतो. दूधासोबत फणस खाल्याने डायजेशन म्हणजे पचनक्रियेमध्ये बिघाड होतो.
त्याच पद्धतीने दूधासोबत आंबट द्राक्ष, अननसचाही सेवन करू नये. फळं ही नैसर्गिक स्वरूपात आणि चावून खाणंच आरोग्याला अधिक फायदेशीर असतात. दुधात नेहमी गोड फळांचा समावेश करावा. त्यात गोड आंबा, केळं, चिकू अशा फळांचा समावेश करावा.