आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फळे, भाज्या आणि सीरियल्समधून शरीराला मिळणारे फायबर म्हणजेच तंतू हे हृदयासाठी खूप फायदेशिर असतात. आहारात तंतुमय खाद्यपदार्थांचा समावेश करून अशा पदार्थांचे नियमित सेवन केल्यास हृदयरोगांपासून बचाव होऊ शकतो.
अशा तंतूमय पदार्थांमुळे महिलांना जास्त फायदा होऊ शकतो. यासंदर्भात लुंड विद्यापीठाच्या संशोधकांनी २० हजारांपेक्षा जास्त लोकांवर केले. या संशोधनासाठी लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींसह फायबर, मेद, प्रथिने आणि कर्बोदके यांच्या प्रमाणाची माहिती घेऊन विश्लेषण केले असता असे आढळून आले की, ज्या महिलांनी उच्च तंतुमय पदार्थांचे सेवन केले त्या महिलांमध्ये हृदयरोग होण्याचा धोका २५ टक्के कमी झाला होता. तर पुरुषांमध्ये हे परिणाम खूप कमी दिसून आले. महिलांनी फळे आणि भाज्यांचे भरपूर सेवन केल्यास त्यांना पुरेसे फायबर मिळते.