• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home Food

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार 

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 17, 2019
in Food, माझं आराेग्य
0
fruit-juice
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : फळांमध्ये असे अनेक औषधी गुण आणि घटक असतात. जे आजार बरा करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. वेगवेगळ्या फळांचा रस वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर गुणकारी ठरतो हे शास्त्रीय पातळीवर सिद्ध झाले आहे.अमेरिकेतील एका संशोधनानुसार कोणत्या फळाचा रस कोणत्या समस्येवर गुणकारी ठरतो सांगण्यात आले आहे.

अननसाच्या रसात आढळणारे ब्रोमेलेन एंजाइम आहारातील प्रोटीन पचवण्यासाठी मदत करतात. रिकाम्यापोटी हा रस पिल्यास यातील ब्रोमेलेन एंजाइम अँटिअन्फ्लेमेटरी एजंट म्हणून काम करतात. यामुळे सांध्यात येणारी सूज आणि दुखण्याची समस्या कमी होते. तसेच सर्दी, पडसे, कफ या आजारात अननसचा रस अत्यंत उपयुक्त ठरतो. तसेच नारळ पाणी हे एनर्जी ड्रिंकसारखेच आहे. यासाठी शारीरिक कसरत केल्यानंतर नारळ पितात. जास्त शारीरिक श्रम केल्यानंतर घामावाटे निघालेल्या पाण्याचे प्रमाण कायम राखण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. यात असणारे इलेक्ट्रोलाइटस मिठाचा पुरवठा करतात. शिवाय,यामुळे रक्तातील साखरेचा स्तर संतुलित राहतो. एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रणात रहाते. गाजराचा रसदेखील गुणकारी आहे. गाजराचा रस दररोज पिणे डोळ्यासाठी चांगले असते. यात अधिक प्रमाणात व्हिटामिन ए असते. जे डोळ्यांची कार्यक्षमता वाढवते. रिकाम्या पोटी तीन ते चार चमचे कोरफडीचा रस प्यावा. कारण यामुळे रक्त शुद्धीकरण होते आणि त्वचेसंबंधी आजार होत नाहीत.

सफरचंदाच्या रसात असलेले अँसेटालकोलीन हे रसायन स्मरणशक्ती वाढवते. मेंदूची कार्यप्रणाली सक्षम ठेवते.अमेरिकेत उंदरावर झालेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की सफरचंदामुळे अल्झायमरचा (स्मृतिभ्रंश) धोका कमी होतो. नियमितपणे सफरचंदाचा रस पिणे युवकांसाठी फायद्याचे ठरते. सफरचंद फायबरचा चांगला स्रोत आहे. याच्यामुळे पचन प्रणाली सुधारते आणि अपचनाची समस्या होत नाही. तसेच संत्र्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असते. यातील स्पेरीडिन नावाच्या अँटिऑक्सिडेंटमुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात. ज्यामुळे हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते. हा रस सायट्रेटचा चांगला स्रोत आहे. आंबट फळांमध्ये हा घटक मोठय़ा प्रमाणात आढळतो. यामुळे किडनीस्टोन(मूतखड्याची) शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Tags: arogyanamaFruithealthjuiceआजारआरोग्यआरोग्यनामाफळ
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021