• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ऑफबिट सौंदर्य

केसगळतीपासून ते पोटाच्या तक्रारींपर्यंत, जाणून घ्या काकडी खाण्याचे ‘हे’ 10 आरोग्यदायी फायदे !

by Sajada
January 8, 2021
in सौंदर्य
0
hair loss

hair loss

213
VIEWS


आरोग्यनामा ऑनलाईन-
ऋतु कोणताही असू द्या बाजारात काकडी सहज उपलब्ध होते. काकडी खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. काकडीमुळं शरीराला पाणी आणि थंडावा मिळतो. याच्या बियांचाही आपल्याला खूप फायदा होतो. काकडीच्या बिया वाळवून त्याचा मगज म्हणून वापर केला जातो. उन्हाळ्यात तर काकडीचं सेवन आवर्जून केलं जातं.

काकडी अशी फळभाजी आहे ज्यात नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात पाणी असतं. यामुळं अनेकदा डॉक्टरही काकडी खाण्याचा सल्ला देतात. काकडी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. याशिवाय याचे इतरही अनेक फायदे होतात. आज आपण काकडी खाण्याचे शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

काकडी खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) अपचन, उलटी, मळमळ, पोट फुगल्यासारखं वाटणं यावर गुणकारी.

2) पोटाला थंडावा मिळतो.

3) जर भूक मंदावली असेल तर काकडीचे काप करून त्यावर पुदीना, काळं मीठ, लिंबाचा रस, मिरे, जिरेपूड घालून खावी.

4) डोळ्यांखाली काळी वर्तुळं आल्यास काकडीचे काप  डोळ्यांवर ठेवावेत.

5) चेहऱ्यावरील डाग किंवा काळवटपणा दूर करायचा असेल तर काकडीचा रस, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून हातानं चेहऱ्यावर मसाज करा.

6) चटका बसला असेल किंवा भाजलं असेल त्यावर काकडीचा रस लावावा.

7) काकडी रोज खाल्ली तर पोट साफ होण्यास मदत होते.

8) आम्लपित्त, गॅसेस, आंत्रव्रण (अल्सर) असे विकार असतील तर काकडीचा कीस किवा काकडीचा रस 2-4 तासांनी प्यावा. यामुळं पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.

9) काकडीचा कीस चेहरा, मान यावर नियमितपणे लावला तर चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या, सुरकुत्या दूर होतात.

10) काकडीचा रस केसांना लावला तर त्यात असणाऱ्या सिलिकॉन व गंधकामुळं केस गळायचे थांबतात.

कधी खाऊ नये काकडी ?

1) हिवाळ्यात आणि पावसाळ्यात शक्यतो ककाडी प्रमाणात खावी.

2) सर्दी किंवा कफजन्य समस्या असतील तर काकडी खाऊ नये.

 

 

 

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

 

 

Tags: CucumberHair Lossstomachआरोग्यकाकडीकेसगळतीपोट
heels
माझं आराेग्य

टाचांना भेगा पडल्या आहेत ? मग घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक तेल

October 26, 2020
अंगावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ फळ आवश्य खा, जाणून घ्या फायदे
फिटनेस गुरु

पोटावरील चरबीचा घेर वाढतोय का ? सकाळच्या ‘या’ 5 वाईट सवयी बदला

January 4, 2020
dandrff
माझं आराेग्य

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

June 4, 2019
बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या
माझं आराेग्य

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

July 10, 2019

Most Popular

Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

19 hours ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

19 hours ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

20 hours ago
Bridal Beauty

तुमचं लग्न ठरलंय ? मग फॉलो करा या ‘ब्रायडल ब्युटी रूटीन, येईल नैसर्गिक ग्लो

21 hours ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.