आरोग्यनामा ऑनलाईन- व्यायाम करणाऱ्या व्यक्तींच्या आहारात अंडी या पदार्थाचा आवर्जून समावेश केला जातो. कारण यात प्रोटीनसह इतरही पोषक घटक जास्त असतात. इतकंच नाही तर याचे आपल्या शरीरासह मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदे होतात. आज आपण याच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.
1) उपयुक्त पोषक घटक – शरीर सदृढ रहाण्यासाठी आवश्यक असणारी अनेक जीवनसत्वे ही अंड्यातून मिळतात. यात फोलेट म्हणजेच अ, ब 12, ब 5 आणि ब 2 ही जीवनसत्वे असतात. इतकंच नाही तर, फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा 3 आणि इतर अनेक महत्त्वाचे घटकही यात असतात. त्यामुळं तंदुरुस्तीसाठी रोज एक अंड खाणं अतिशय गरजेचं आहे.
2) मुबलक कोलेस्टेरॉल – अंड्यात कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असतं. परंतु याचा आपल्या शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. कोलेस्टेरॉलमधील अनेक घटक हे आरोग्यासाठी खूप उपुयक्त असतात. आहारात अंड्यांचा समावेश केला तरीही त्याचा शरीरावर किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलवर परिणाम होत नाही. हेच कारण आहे की, मधुमेह असणाऱ्यांनाही डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात.
3) हृदयरोग कमी होण्यासाठी उपयुक्त – अंडी खाल्ल्यानं हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्यामुळं हृदयरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंड्यांचा आहारातील समावेश हा फायदेशीर ठरतो.
4) डोळ्यांसाठी फायदेशीर – अंड्यात ल्यूटीन आणि झिझेन्थिन ही दोन अँटीऑक्सिडंट असतात. उत्तम दृष्टीसाठी हे दोन्हीही घटक खूप गरजेचे आहेत. अंड्यातील पिवळ्या बलकात हे घटक समाविष्ट असतात. त्यामुळं अंड्याचा हा पिवळा भाग खाणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मोतीबिंदू आणि रेटीनाच्या समस्या उद्भवू नयेत. यासाठी हे दोन्हीही अँटीऑक्सिडंट आवश्यक असतात.
5) वजन कमी होण्यास मदत होते – अंड्यात मोठ्या प्रमाणावर प्रथिनं असतात. त्यामुळं अंडी खाल्ल्यानंतर बराच बराच वेळ भूक लागत नाही. अंड्यामुळं पोट भरल्यासारखं वाटतं आणि सातत्यानं खाण्यावर नियंत्रण येतं. यामुळं जास्त कॅलरीज निर्माण होत नाहीत. उलट त्या वापरल्या जातात. याचा फायदा वजन नियंत्रणात राहण्यासाठी होतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.