आरोग्यनामा ऑनलाइन टीम : अपचन अथवा पोटाची अन्य कोणतीही समस्या असल्यास पोटात गॅस तयार होतो. आणि हा गॅस शरीराबाहेर सोडला जातो. अनेकदा या गॅसला दुर्गंधी असते. गॅस सोडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सर्वांनाच हा अनुभव येतो. सर्वजण शरीरातील अनावश्यक गॅस बाहेर काढतात. मात्र, काहींना ही समस्या मोठ्या प्रमाणात असू शकते. काहींच्या गॅसची खूप दुर्गंधी येते. अशावेळी आजूबाजूच्यांनाही त्रास होतो. मात्र, या समस्येवर एका शास्त्रज्ञाने आश्यर्चकारक असा उपाय शोधला आहे. या शास्त्रज्ञाने तयार केलेल्या टॅबलेट्स खाल्ल्यास बाहेर सोडलेल्या गॅस हा सुगंधी असू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
ही टॅबलेट क्रिस्टियन पोंचेवल नावाच्या एका शास्त्रज्ञाने तयार केली आहे. ते फ्रान्सच्या पश्चिम भागातील शहरात राहतात. क्रिस्टियन यांनी दावा केला आहे की, त्यांनी तयार केलेल्या गोळ्या घेतल्या तर तुमच्याद्वारे सोडल्या जाणाऱ्या गॅसला गुलाब किंवा चॉकलेटचा सुगंध येऊ शकतो. या गोळ्यांमुळे गॅसला दुर्गंध नाही तर सुगंध येईल. यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होणार नाही. क्रिस्टियन पोंचेवल हे २००७ पासून अशाप्रकारची टॅबलेट विकसित करत आहेत. तसेच त्यांनी ही टॅबलेट विकण्यासाठी एक वेबसाइटही तयार केली आहे.
या वेबसाइटवर दावा करण्यात आला आहे की, ही टॅबलेट पूर्णपणे नैसर्गिक असून या टॅबलेटमध्ये चिकित्सा किंवा औषधाच्या आधारावर काहीही नाही. ही टॅबलेट मोठ्या अभ्यासानंतर आणि परिक्षणांनंतर तयार केली आहे. ही टॅबलेट २००७ पासूनच विकली जात आहे. या टॅबलेटची मागणी वाढली असून टॅबलेटचा ट्रेन्ड वाढत आहे. क्रिस्टियन पोंचेवल काही मित्रांसोबत एका डिनर पार्टीला गेले असताना त्यांना या टॅबलेटची कल्पना सुचली.
जेवण करताना त्यांनी दुर्गंधी येणारी गॅस सोडल्याने तिथे बसणेही कठीण झाले होते. त्यानंतर त्यांनी लुटिन मलिक नावाची कंपनी सुरू केली आणि ही टॅबलेट तयार करणे सुरू केले, असे पोंचवेल यांनी एका मुलांखतीमध्ये सांगितले होते. या औषधांसंबंधीचे वृत्त ‘मिरर डॉट को डॉट यूके’ने दिले आहे.