विसरून जा आरोग्याचे जुने सल्ले, जाणून घ्या वास्तव

vegetables

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घरातील मोठी मंडळी लहानपणापासून आपल्याला सतत सल्ले देत असतात. हे करा, ते करू नका, अमूक त्रास होतोय तर ही काळजी घ्या असे सांगितले जात असे. त्यानंतरच्या पीढीला पुन्हा असेच सल्ले देण्याचे काम सुरूच असते. तज्ज्ञांच्या मते, अनेक गोष्टींना कसलाही वैज्ञानिक आधार नसताना विनाकारण अनुसरण केले जाते. प्राचीन काळापासून ज्या गोष्टी आपण ऐकत आलो आहोत, त्या गोष्टींचे पालन आजही काही जण डोळे झाकून करतात. यापैकी बऱ्याच गोष्टी केवळ भ्रम आहेत. आरोग्याबाबत दिल्या जाणाऱ्या, मात्र वास्तवाशी काहीही संबंध नसणाऱ्या अशाच काही सल्ल्यांबाबत आपण माहिती घेणार आहोत.घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की, दिवसभरात आठ ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, केवळ पाणी पिऊन शरीर हायड्रेट करता येत नाही. याशिवाय ताज्या फळांचा ज्यूस, दूध व भरपूर भाज्यांचे सेवन करणेही तितकेच महत्वाचे आहे. या सर्व खाद्यपदार्थांचे सेवन केले तर पाणी पिण्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. याउलट व्यक्ती केवळ पाणी पिण्यावर भर देत असेल तर शरीरात इलेक्ट्रोलाइट असंतुलित होतात आणि सोडियमची पातळी घसरते, असे इंडियान युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या चिल्ड्रन्स हेल्थ सर्व्हिस रिसर्चमध्ये म्हटले आहे.

आपल्याला असेही सांगितले जाते की, अधिक ताण घेतल्यास केस पांढरे होतात. या तज्ज्ञ सांगतात की, अतिताण नक्कीच पीडिताचे अंतर्गत व बाह्य पातळीवर नुकसान करतो. तणावामुळेच फ्री रॅडिकल्सची संख्या वाढते आणि निरोगी पेशींचे नुकसान होते. मात्र, तणावामुळेच केस पांढरे होतात, यास काहीही वैज्ञानिक आधार नाही. भोजनात पोषक घटकांचा अभाव आणि आनुवंशिक कारणांमुळेही असे होऊ शकते. तसेच कमी प्रकाशात वाचन डोळ्यांसाठी हानिकारक आहे, दृष्टी कमी होते, असे घरातील ज्येष्ठ नेहमी सांगतात. कमी प्रकाशात वाचल्याने डोळ्यांवर दबाव पडतो. यामुळे डोकेदुखी, डोळे लाल वा कोरडे होऊ शकतात. मात्र, डोळ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होत नाही. रात्री पुरेशी झोप घेऊन वरील लक्षणांपासून सुटका होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढतात, यामुळे हृदयाची हानी होते, असे म्हटले जाते. एका संशोधनानुसार, सॅच्युरेटेड व ट्रान्सफॅटमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. डायटरी कोलेस्टेरॉलमुळे मुळे हा धोका वाढत नाही. एका अंड्यात १.६ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असते. ते एक कप दुधातील ३ ग्रॅमबरोबर असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने सांगितले आहे की, दररोज ३०० मिलिग्रॅमपेक्षा अधिक फॅट आहारात समाविष्ट करू नये. अंड्यातून भरपूर प्रथिने, अ व ड जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे नाश्त्यात एका अंड्याचा समावेश अवश्य करावा. अंड्यामुळे शरीराला फायदाच होतो. त्यामुळे अंडे रोज खाणे चांगले आहे. तसेच ताप असताना कमी भोजन करावे. पथ्य पाळावे, असेही ज्येष्ठ सांगतात. मात्र, हे चूकीचे आहे. ताप व सर्दी-पडशासाठी बाह्य संक्रमणे कारणीभूत असतात. अशा प्रकारचा व्हायरल फीव्हर ७-१० दिवसांत बरा होतो. या काळात कमी भोजन करू नये वा भोजनाबाबत पथ्य पाळू नये. अशावेळी स्वाद ग्रंथी सुरळीतपणे काम करत नसल्याने आजारी माणसाला काहीतरी खावे वाटते. मात्र, अशा व्यक्तीने पेय पदार्थांचे सेवन करणे चांगले असते.