आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केवळ मुलींनीच नव्हे तर मुलांनीही आपले तारूण्य दिर्घकाळ टिकवण्यासाठी योग्य ती काळजी नियमित घेतली पाहिजे. यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे चेहऱ्यावर तारुण्याची झळाळी येते. हे पदार्थ कोणते याविषयी माहिती घेवूयात.
हे उपाय करा
किवी
यातील अँटीऑक्सिडंट व व्हिटॅमिन सी मुळे तारूण्य टिकून राहते.
डार्क चॉकलेट
दररोज थोडेसे डार्क चॉकलेट खा. यामुळे हानिकारक किरणांपासून बचाव होतो.
ऑलिव्ह तेल
हे नियमित खाल्ल्याने व त्वचेवर लावल्याने त्वचा निरोगी राहते.
भोपळा
यातील व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुळे तारुण्य खूप काळ टिकते. सुरकुत्या नाहीशा होतात.
रेड वाईन
रेड वाईनमधील अँटी एजिंग तत्त्वामुळे त्वचा सुंदर बनवतात.