आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन घाम गाळण्याची काहीही गरज नसते. केवळ चालण्याचा व्यायाम नियमित आणि योग्य प्रमाणात केला तर तुम्ही सडपातळ होऊ शकता. यावरून चालणे हा किती लाभदायक व्यायाम प्रकार आहे हे लक्षात येते.
हे आहेत चालण्याचे फायदे
१) एक कि.मी. म्हणजेच दोन हजार पावले चालल्यास शंभर कॅलरीज कमी होतात.
२) पस्तीसशे कॅलरीज म्हणजे एक पाऊंड होय. एका आठवड्यात एक पाऊंड वजन कमी करायचे असल्यास दिवसाला पाचशे कॅलरीज कमी होतील एवढे चालावे.
हे लक्षात ठेवा
* दिवसाला पंधरा ते वीस मिनिटे आणि आठवड्यातून तीन दिवस चालण्यापासून सुरुवात करा.
* नंतर वेळ वाढवून ३० ते ६० मिनिटांपर्यंत न्या.
* डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. यासाठी फिट आहात अथवा नाही, हे जाणून घ्या.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)