आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही मुलींना मासिक पाळी येऊन २८ दिवस पूर्ण होतात. तरी त्यांना पाळी येत नाही. त्यामुळे अनेक मुली चिंतेत असतात. या समस्येवर त्यांना नेमका काय उपाय करावा तेच कळत नाही. मासिक पाळी चुकण्याची अनेक कारणे आहेत. त्या कारणांमुळे मुलींना वेळेवर मासिक पाळी येत नाही. ही कारणे तुम्ही खालील मुद्याच्या आधारे जाणून घेऊ शकता.
१) पीसीओएस आणि पॉलिसिस्टीक ओव्हरीयन डिसिज या दोन्ही समस्या उद्भवल्यास महिलांच्या शरीरात ‘सिस्ट’ची निर्मिती होते. आणि बऱ्याचदा ह्यामुळे मासिक पाळी चुकत असते.
२) तणाव जास्त झाल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. आणि मासिक पाळीची वेळ चुकू शकते. सध्या मानसिक तणावाचे प्रमाण सर्वच स्तरावर वाढत असताना पाळी चुकण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असण्याची शक्यता असते. तुमचा तणाव वाढलेला असताना तुमच्या शरीरातील काही हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे पाळी चुकते.
३) प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक कष्ट झाल्यास किंवा अति प्रमाणात काम करणे व खूप कमी खाणे ह्यामुळे मासिक पाळीच्या नियमिततेवर परिणाम होतो. जास्तीच्या व्यायामामुळे आणि श्रमामुळे थायरॉईड आणि ‘पिट्युटरी’ ग्रंथींवर परिणाम होऊन पाळी चुकू शकते.
४) थायरॉईडमुळे शरीरातील हॉर्मोन्स असंतुलित होतात आणि त्याचा परिणाम मासिक पाळी चुकण्यात होतो. थायरॉईडमुळे शरीरातील ऑस्ट्रोजेन आणि कॉर्टीसॉल या घटकांची पातळी कमी होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये अनियमितता येते.