आरोग्यानामा ऑनलाईन टीम : खजुरामध्ये लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आरोग्य चांगले राहते. यात ग्लुकोज आणि फळांमधील साखर जास्त असते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी खजूर लाभदायक आहेत. तसेच कर्करोग, हृदय रोगावरही खजूर वरदान आहे.
हे आहेत फायदे
१ हाडांची चांगली वाढ होते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्तपणामुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घ्यावी.
२ त्वचेची कोणतीही समस्या जाणवत नाही. अकाली वृ्द्धत्व कमी होते.
३ रात्री खारीक भिजवून सकाळी खाल्यास आरोग्य चांगले राहते.
४ भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्यावी. थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यावी. हे दुध प्यावे. यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.
५ खजुरामध्ये विद्राव्य फायबर असतात जे पोट साफ करण्यासाठी उपयोगी ठरतात.
६ यातील आयर्नमुळे गरोदर स्त्रियांसाठी खजूर उत्तम आहेत.
७ यात ग्लुकोज, फळातील साखर असल्याने उर्जा मिळते.
८ वजन वाढविण्यासाठी खजूर उपयोगी आहे.
९ हाडे मजबूत होण्यास मदत होते.
१० अपचनाचा त्रास दूर होतो.
११ चेहरा तजेलदार होतो. सुरकुत्या कमी होतात. त्वचा उजळते.
Visit : arogyanama.com