आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जगभरात अशी हाजारो जोडपी आहेत, ज्यांना इच्छा असूनही मुल होऊ शकत नाही. ही समस्या निर्माण होण्यास केवळ महिलाच जबाबदार नसून यास पुरूषदेखील कारणीभूत असू शकतात. या समस्येचे कारण समजल्यास उपचार करणे अधिक सोपे जाते. प्रेग्नेंसीला बाधक १० कारणे जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
१. हार्मोनल
थॉयरॉइडसारख्या हार्मोनल समस्येमुळे स्पर्म काउंट कमी होते. महिलांची मासिक पाळी बिघडते व एग्ज प्रोडक्शनवरही परिणाम होतो.
२. औषधे
जास्त गरम औषधे घेतल्याने पुरुषात स्पर्म काउंट आणि गुणवत्ता कमी होते. महिलांची मासिक पाळी बिघडते. एग्जचा दर्जा कमी होतो.
३. मधुमेह
मधुमेहामुळे स्पर्म काउंट ५० टक्के कमी होऊ शकतो. एग्ज प्रोडक्शनवर फरक पडतो आणि मासिक पाळी चुकते.
४. व्यवसाय
नाईट शिफ्ट, जास्त उष्ण ठिकाणी काम करणे, ताणतणावाचे काम, जास्त घट्ट अंडरवियर आदी कारणाने स्पर्म काउंट कमी होतो. जास्त ताणतणावाचा परिणाम होतो.
५. आजारपण
लहानपणाच्या एका ठराविक शारीरिक व्याधीमुळे स्पर्मची निर्मिती होणे बंद होते. हायडड्ढोसील, हार्नियासारखे आजारदेखील स्पर्मची निर्मितीला अथडळा आणतात. युटड्ढेससंबंधीत आजारपण, कॅन्सर, व्हेजाइनल इन्फेक्शनच्या कारणाने महिलांमध्ये प्रेग्नेंसीला अथडळा येतो.
६. लठ्ठपणा
लठ्ठपणामुळे पुरु षांमध्ये फिजिकली अॅक्टिव्हिटी कमकुवत होते. स्पर्म काउंट कमी होतो. महिलांच्या ओवरीमध्ये चरबी वाढल्याने एग्ज विकसित होत नाहीत.
७. वय
पुरुषांच्या ३५-४० व्या वर्षीच स्पर्म काउंट कमी होऊ लागतो. महिलांमध्ये ४० वयानंतर मेनोपॉज किंवा हार्मोनल प्रॉब्लेम्समुळे प्रेग्नेंसीमध्ये अडथळा येतो.
८. संक्रमण
पुरूषांमध्ये युरीन इंफेक्शन किंवा क्षयरोगाच्या कारणाने स्मर्प काउंट कमी होऊ शकतो. महिलांमध्येही युरीन इंफेक्शन आणि युटड्ढसमध्ये क्षयरोगाच्या कारणाने फेलोपियन ट्यूब खराब होते.
९. व्यसन
सिगारेट, मद्यपान, व्यायामाचा अभाव, तंबाखु, लेट नाइट पार्टी आदी कारणाने स्पर्म काउंट कमी होतो. महिलांमध्येही नशा करणे तसेच खराब जीवनशैलीमुळे प्रेग्नेंसीमध्ये अडथळा येतो.
१०. ताणतणाव आणि डिप्रेशन
या कारणाने स्पर्म काउंट आणि त्याची गुणवत्ता कमी होते. फिजिकल अॅक्टिव्हिटीवर परिणाम होतो. महिलांमध्ये प्रोलेक्टीन नावाचा हार्मोन्स वाढल्याने प्रेग्नेंसीमध्ये अडथळा येतो.