आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराची रोग प्रतिकारकशक्ती कमी झाल्याने विविध आजार जडतात. यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे खुप महत्वाचे असते. ही शक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार खुप महत्वाचा आहे. काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती अनेक पटींनी वाढते. हे पदार्थ कोणते, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
ओट्स
फायबर आणि अँटिमायक्रोबियल गुण असल्याने ओट्स नियमित खावेत. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.
व्हिटॅमिन सी
लिंबू आणि आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. हे खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
ग्रीन टी आणि ब्लॅक टी
एका दिवसांत याचे एक किंवा दोन कप प्यायल्यास रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
कच्चा लसूण
यात एलिसिन, जिंक, सल्फर, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ए व ई असल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
दही
दहीच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासोबतच पचन क्रियाही उत्तम होते.