आरोग्यनामा ऑनलाइन टीम – योग्य डायट, व्यायाम करणे, भरपूर पाणी पिणे, नियमित नाश्ता करणे, चालणे, तणावमुक्त राहणे, आदी काळजी घेतली तर फिट राहणे खुप सोपे आहे. फिट राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
या सवयी लावून घ्या
१. रोज पायी फिरणे, जिन्याचा वापर करणे या सवयीमुळे शरीर फिट राहते.
२. व्यायामानंतर नेहमी शरीरास ताण दिल्याने तुम्ही फिट राहू शकता.
३. नेहमी ताठ बसून काम करा. यामुळे मांसपेशींबरोबरच पाठीचा कणाही मजबूत होतो.
४. तणावात राहू नका. मन प्रसन्न आणि तणावमुक्त ठेवा. यामुळे आरोग्य सुदृढ राहून शरीर फिट राहील.
५. पुरेशी झोप घ्या. यामुळे शरीर फिट राहील, तसेच ऊर्जावानदेखील राहील.
६. फिट राहण्यासाठी योग्य आहार घ्या. आहारात प्रोटीन, विटॅमिन्स भरपूर घ्या.
७. सकाळी उपाशीपोटी एक ग्लास पाणी प्या. दिवसभरात ६ ते ८ ग्लास पाणी अवश्य प्या.
८. फिट राहण्यासाठी रोज किमान अर्धा तास व्यायाम करा.
९. सकाळी न चुकता भरपेट नाश्ता करा. यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते. शरीर दिवसभर ऊर्जावान राहते.