आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण अधिक वाढले आहे. थॉयरॉईड ही मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथी आहे. या ग्रंथीचे स्थान गळ्यात विशिष्ट ठिकाणी असते. थायरॉईड हार्मोनमुळे आपल्या शरीराच्या अवयवांच्या क्रिया नियंत्रित होतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईडचा आजार उद्भवतो.
थायरॉईडची लक्षणे
थकवा येणे,
महिलांना वारंवार जादा मासिक स्त्राव होणे,
विसरभोळेपणा, वजन वाढणे,
कोरडी-खरखरीत त्वचा आणि पातळ केस, थंडी सहन न होणे
थायरॉईड या आजारावर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. हा आजार बरा होण्यासाठी खूप पथ्ये पाळावी लागतात. योग्य आहार आणि गोळ्या घेतल्यावर थायरॉईडवर नियंत्रण ठेवता येतं.
थायरॉईडचे पथ्य
कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकली या भाज्यांना खाणे टाळा.
दिवसभरात दोनपेक्षा जास्त कप कॉफी पिऊ नका.
तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा.
सोयापासून तयार करण्यात आलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका
गोड पदार्थ कमी प्रमाणात खा.
कच्चे सॅलेड खाल्ल्याने शरीराला त्रासही होतो.
आहारात या पदार्थांचा समावेश करा
दूध आणि दह्याचा आहारात समावेश करा.
कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी , व्हिटॅमिन ‘ए युक्त पदार्थांचे सेवन करा.
गाजर, अंडी आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करा.
फळं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा.