आरोग्यनामा ऑनलाईन टीम – व्हाईट ब्लड सेल्स आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. व्हाईट ब्लड सेल्स आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते आणि शरीरात येणाऱ्या विषारी घटकांना नष्ट करते. ज्यांच्या शरीरात व्हाईट ब्लड सेल्स कमी होतात त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपल्या जेवणात अशा काही अन्नपदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे आपल्या शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स वाढण्यात मदत होते.
ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये भरपूर मात्रात अँटी ऑक्सिडंट गुण असल्याने शरीरासाठी फायदेमंद असते. ग्रीन टी मेटाबॉलिझम आणि इम्युनिटीसाठी उपयुक्त असतो. यामध्ये फॅटची मात्रा काहीच नसते याचे नियमित सेवन केल्याने वजनही कमी होते. तसेच याच्या नियमित सेवनाने व्हाईट ब्लड सेल्स वाढवण्यातही मदत होते.
लसूण
लसूणमध्ये असणाऱ्या अँटी बॅक्टेरियल , अँटी इन्फ्लेन्ट्री आणि अँटी व्हायरल गुणामुळे हे शरीरासाठी खूप फायदेमंद असते. या गुणांमुळे शरीरात असणाऱ्या विषारी घटकांना नष्ट करते आणि व्हाईट ब्लड सेल्स वाढण्यातही मदत करते.
दही
दह्यामध्ये अनेक गुणकारी घटकांचा समावेश असतो. याच्या रोज सेवनाने आजारांपासून लढण्याची क्षमता आणि व्हाईट ब्लड सेल्स वाढवण्यात मदत होते . दह्यामध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शिम असते. दह्याच्या सेवनाने शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
झिंक युक्त पदार्थ
ब्लड सेल्स मध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे झिंक. रक्तात झिंकची कमतरता असल्यास व्हाईट ब्लड सेल्स कमी होतात. ज्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे आपल्या आहारात झिंकचा समावेश करावा. मास, मासे आणि दूध या पदार्थांचा सेवन करावा. या पदार्थांमध्ये झिंकची मात्रा जास्त असते.
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी रक्तातील विषारी कोलेस्ट्रॉलची संख्या कमी करते. तसेच व्हाईट ब्लड सेल्स वाढवण्यातही मदत करते. यामुळे व्हिटॅमिन सी च्या सेवनाने शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहण्यात मदत होते. फळे, हिरव्या भाज्या, टोमॅटो, शिमला मिर्ची अशा पदार्थात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. म्हणून नियमितपणे या पदार्थांचे सेवन करावा.