आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आहारातही अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे बाहेरील अनेक खाद्यपदार्थच्या सेवनाने आपले आपल्या आरोग्याकडे लक्ष नाही. यामुळे काहींचे वजन खूपच वाढत चालले आहे. तर काहींचे खूपच कमी होत चालले आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक आहार तज्न सल्ला देतात. पण वजन वाढवण्यासाठी मात्र कोणीच सल्ला देत नाही. त्यामुळे आज आपण वजन कसे वाढवायचे याबाबत जाणून घेणार आहोत.
१) बटाटा –
तुम्हाला जर तुमचे वजन वाढवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात बटाट्याचा समावेश करा. कारण बटाट्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन ‘सी’ असते. त्यामुळे तुम्ही जर दररोजच्या जेवणात बटाट्याचा समावेश केला तर तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.
२) पीनट बटर –
तुमचे वजन खूपच कमी झाले असेल आणि तुम्हाला जर नैसर्गिकपणे वजन वाढवायचे असल्यास पीनट बटर हा उत्तम पर्याय आहे. दररोजच्या आहात एक चमचा पीनट बटर खा.
३) मिक्स ड्रायफ्रुट –
मिक्स ड्रायफ्रुट तुमचे वजन वाढवण्यास नक्कीच मदत करेल. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. १०० ग्रॅम सुका मेव्यामध्ये ५००-६०० कॅलरीज असतात. त्यामुळे याने वजन लवकर वाढते.
४) अंडी –
आपले वजन वाढवण्यासाठी अंडी हा उत्तम पर्याय आहे. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटामिन डी आणि चांगले कोलेस्ट्रॉल असते. वजन वाढवण्यासाठी अंडी खा.
५) केळी –
केळीमध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि इतर पोषकतत्वांचा मोठा भरणा असतो. केळ्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. एका मीडियम साईजच्या केळ्यामध्ये १२० कॅलरीज असतात. दररोजच्या आहारात केळ्याचा समावेश केल्यास नक्कीच तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.