‘मसल्स’ मजबूत करा, आहारात आजपासूनच समाविष्ट करा ‘हे’ १५ फूड
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मसल्स आणि पिळदार शरीर बनवण्यासाठी व्यायाम आवश्यक असतो. परंतु, आहारही तेवढाच महत्वाचा असतो. काही फूड फॅट कमी करून मसल्स बनवण्यास आणि यांना टोन करण्यास मदत करतात. अशाच १५ फूडविषयी आपण माहिती घेणार आहोत.
बीन्स
यामध्ये फायबर आणि प्रोटीन्स असते, जे शुगर लेव्हल वाढू देत नाहीत. मसल्स वाढण्यासाठी शरीराला उर्जा देतात.
सेलमन फिश
प्रोटीन्सचा उत्तम सोर्स असून यामध्ये उशीरा डायजेस्ट होणारे कार्ब असतात जे मसल्ससाठी आवश्यक असतात.
सोयाबिन
यातील प्रोटीन्स मसल्स बनविण्यास मदत करतात तसेच या प्रक्रियेला गतीसुद्धा देतात.
पालक
यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते जे मसल्स बनविण्यासाठी खूप आवश्यक आहे.
दही
दह्यात व्हिटॅमिन डी असते. ज्यामुळे मसल्स मजबूत होतात.
कलिंगड
यातील अॅथोसायनीन शरीरात चरबी साठू देत नाही. तसेच व्यायामामुळे झालेले मसल्सचे नुकसान भरून काढते.
ज्वारी
ज्वारीमध्ये मॅग्नेशियम असते जे मसल्समधील रक्ताभिसरण वाढवते आणि मसल्सला टोन करते.
ब्रोकोली
टेटॉस्टेरॉनचे शरीरातील प्रमाण वाढते. शरीरात फॅट होऊ देत नाही. तसेच मसल्स मजबूत बनविते.
मशरूम
हे व्हिटॅमिन डी चा चांगला सोर्स आहे. हे मसल्स बनविण्यासाठी आवश्यक असते.
मसूरडाळ
प्रोटीन्सचा चांगला सोर्स असून यातील उशीरा डायजेस्ट होत असलेल्या कार्बमुळे मसल्स मजबूत होतात.
बीटरूट
यामध्ये भरपूर फायबर आणि आयर्न असते. हे मसल्समधील रक्तप्रवाह वाढवते व त्यांना मजबूत करते.
ऑलिव्ह ऑईल
यातील सेरॉटेनिन हार्मोन्स ब्लड लेव्हल वाढवतात. यामुळे मसल्सचे टोन होते.
केळी
यामध्ये डायजेस्टिव शुगर आणि पोटेशियमची मात्रा चांगली असल्याने मसल्सची रिकव्हरी होते.
बदाम
यात प्रोटीन्स, मॅग्नेशियम भरपूर असून यामुळे एनर्जी लेव्हल वाढते. तसेच मसल्सला टोन करते.
पपई
यामध्ये व्हिटॅमिन सी असून हे सुद्धा मसल्स टोन करते.
Comments are closed.