आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कामाचा ताण, स्पर्धा आणि दगदग यामुळे पुरूषांच्या आरोग्यावर लवकर विपरित परिणाम होत असतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे आहारही चूकीच्या पद्धतीने घेतला जातो. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता निर्माण होते. वयाच्या तिशीनंतर पुरूषांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. काही विशेष पदार्थांचा पुरूषांनी त्यांच्या आहारात समावेश केला तर कमजोरी दूर होऊन शरीर ताकदवान होऊ शकते. हे पदार्थ कोणते याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
सोयाबिन
सोयाबिनमधील आइसोफ्लॅवोन्स प्रोस्टेटला सुरक्षीत ठेवत असल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका टळतो. रोज २५ ग्रॅम सोया प्रोटिन खावे. यामुळे कॉलेस्टेरॉलचा स्तर कमी होतो.
मोड आलेली कडधान्ये
मोड आलेली कडधान्ये सेवन केल्याने शरीराला मुबलक प्रमाणात पोषक घटक मिळतात. याबरोबरच यात झिंक आणि इतर पोषक घटक असतात जे पुरूषांमधील कमजोरी आणि नपुंसकता कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.
शेंगदाणे
शेंगदाण्यामध्ये झिंक तसेच स्निग्ध आम्ल भरपूर प्रमणात असते. स्निग्ध आम्ल पुरूषांसाठी उपयोगी असून याच्या सेवनाने पुरूषांमधील कमजोरीची समस्या दूर होते.
लसुण
पुरूषांनी नेहमी लसणाचे सेवन केले पाहिजे. कारण लसणामध्ये अॅन्टी- बॅक्टेरिअल आणि अॅन्टीव्हायरल तत्व असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लसणातील अॅन्टीऑक्सीडन्ट गुणांमुळे पचंनसंस्था चांगली राहते.
गवती चहा
पुरूषांनी नियमित गवती चहा घ्यावा. गवती चहामध्ये मुबलक प्रमाणात असलेले पॉलिफिनॉल कॅन्सर रोखण्यासाठी उपयुक्त आहे. गवती चहा पिल्याने पोट, फुफ्फुस आणि आतड्याचे सर्व आजार नाहीसे होतात.
आंबा आणि पपई
आंबा आणि पपईमध्ये अ जीवनसत्त्व भरपूर असते. आंब्यामध्ये अॅमिनो आम्ल अ, क आणि ई जीवनसत्तव नियासिन, बिटाकॅरोटिन, लोह, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम असते. पपईमध्ये व्हिटामिन ब, क आणि अॅन्टीऑक्सिडन्ट असते. या दोन्ही फळांच्या सालीमध्ये बायोफ्लॅवेनॉइड्स असतात. यामुळे पुरूषांनी डाएटमध्ये या फळांचा समावेश करावा.
शिमला मिरची
शिमला मिरचीही पुरूषांसाठी चागंली असते. संत्र्याच्या रसापेक्षा शिमला मिरचीत तीन पट जास्त व्हिटामिन असतात. फ्लॅवोनॉइड्ससाठी लाल रंगाची शिमला मिरची उपयुक्त असते. यामुळे पुरूषांची ताकद वाढते.
दूध, पनीर, दही
पुरूषांनी दुग्दजन्य पदार्थांचे सेवन नियमित करावे. यामुळे शरीरात ताकद निर्माण होते. एक कप दूधातून जवळपास ८ मि.ग्रा कर्निटिन मिळते. दूधाच्या पदार्थांमध्ये कॅल्शिअम, अ आणि ड जिवनसत्त्वही उपलब्ध आसतात.
टोमॅटो
टोमॅटोमधील लाइकोपिन अॅन्टीऑक्सीडन्ट गुण असतात. हे प्रोस्टेट, फुफ्फुस आणि पोटाचा कॅन्सरला नष्ट करते.
डाळिंब
डाळिंबाचा रस पुरूषांनी रोज एक ग्लास पिल्याने प्रोस्टेटची समस्या नाहीसी होते.
नाचणी
नाचणी हा कॅल्शियमचा चांगला स्त्रोत असून यामुळे ऑस्टियोपोरिस होत नाही. तसेच शरीराला आवश्यक असलेले झिंक आणि फायबरही मिळते. नियमित नाचणीचे सेवन केल्यास डिसलिपिडीया, मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या समस्या दूर होतात.
दुधी भोपळा
दूधी भोपळयात फायबर, जिवनसत्त्व, खनिज आणि सौंदर्यवर्धक अॅन्टीऑक्सीडन्ट असतात. यामुळे त्वचा नेहमी तरूण राहते.