आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुंदर दिसण्यासाठी अनेक सौंदर्यप्रसाधनं वापरली जातात. सुंदर दिसण्यासाठी आपण फक्त बाहेरून उपचार करतो. मात्र सौंदर्यासाठी पोषक आहारही तेवढाच महत्वाचा आहे. त्वचेला संरक्षण देणारे आणि सौंदर्य वाढवणाऱ्या खालील पदार्थांचा जेवणात नेहमीच समावेश असू द्यात.
दही
दह्यात बॅक्टेरियांशी लढण्याची क्षमता असते. त्यामुळे त्वचेवर पुरळ आणि इतर समस्या उद्भवत नाहीत.
दही हे पोटाच्या आरोग्यासाठीही उपयोगी आहे. यामुळे आतड्यांचं कार्य सुरळीत राहतं. पोट साफ तर त्वचाही सुंदर राहते.
फाटलेल्या ओठांसाठी दही फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन बी-मुळे ओठ मुलायम राहतात.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये लायकोपेन असतं, ज्यामुळे सनबर्नपासून संरक्षणम मिळतं.
टोमॅटोत कॅरोटेनॉईड्स असतात जे त्वचेतील पेशींची जास्त हानी होऊ देत नाहीत.
टोमॅटो पेस्ट आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून दररोज १० आठवडे लावा. त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांशी लढण्याची तुमची त्वचा स्वत: तयार होते.
लसूण
लसूणातील अँटिबॅक्टेरिअल घटक पुरळ येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करतात. याशिवाय लसणीतील अँटि-इन्फ्लेमेटरी घटक त्वचेला सूज आणि जळजळीपासून दूर ठेवतात.
अक्रोड
अक्रोडमध्ये ओमेगा-२ फॅडी असतं. जे केस आणि नखांसाठी फायदेशीर असतं. केस आणि नखांना चमक येते. अक्रोड खाल्ल्यानं त्वचा कोमल होते, त्वचेवरील डाग दूर होतात.
स्ट्रॉबेरी
बेरीजमध्ये अँटि-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन बी-६ आणि सी असतं, ज्यामुळे कोलेजनची निर्मिती वाढते. कोलेजनमुळे त्वचेवरील लाईन्स आणि रिंकल्स दूर होतात. तसंच यातील अँटि-ऑक्सिडंट फ्री-रेडिकल्सपासून त्वचेला संरक्षण देतं.
अंडी
अंड्यामध्ये प्रोटिन जास्त असतं. हानी झालेल्या पेशींना सुधारण्याची क्षमता प्रोटिनमध्ये असते. त्यामुळे तुमची त्वचा तरुण ठेवण्यासाठी आहारात प्रोटिन असणं खूप गरजेचं आहे.
अवोकॅडो
अवोकॅडोमधून बायोटिन घटक असतं, जे त्वचेला कोरडेपणापासूनन संरक्षण देतं. बायोटिनमुळे केस आणि नखांचं आरोग्यही चांगलं राहतं. अवोकॅडो खाण्यासोबत चेहरा आणि शरीराच्या इतर त्वचेवरही लावू शकता. अवोकॅडोचा गर मॉईश्चराझर म्हणून वापरू शकता.
मासे
काही माशांचा आहारात समावेश केल्यानं त्वचा सुंदर होते. ओमेगा-३ असलेले मासे तुमचे निरोगी राखतात.
तसेच वाढत्या वयात त्वचेवर होणारे परिणामही कमी होतात, त्यापासून संरक्षण देतात.