आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वातावरणातून ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे हे फुफ्फुसांचे महत्वाचे कार्य आहे. हाच ऑक्सिजन रक्ताव्दारे हृदयापर्यंत पोहोचतो. एक प्रकारे माणसाला जीवंत ठेवण्याचे कामच फुफ्फुसे करत असतात. म्हणून त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. अयोग्य आहार, हवेतील प्रदूषण, संसर्ग, यामुळे फुफ्फुसांशी संबधीत टीबी, अस्थमा, कॅन्सर असे गंभीर आजार होऊ शकतात. आहारात काही खास पदार्थांचा समावेश केल्यास फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहू शकते. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.
हे पदार्थ नियमित खा
1 संत्री, लिंबू, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, अननस आणि कैरी.
2 लायकोपेन मिळवण्यासाठी टोमॅटो, गाजर, कलिंगड, पपई तसेच हिरव्या भाज्या खाव्यात.
3 लसणामध्ये अॅलिसीन, अॅटी-ऑक्सिडेंट्स असतात जे आरोग्यासाठी चांगले आहे.
4 मनुक्याचे 15 दाणे रात्री पाण्यात भिजवा. सकाळी उठून ते मनुके खावेत. मनुके भिजवले पाणी प्यावे. एक महिना हा उपाय करावा.
5 तुळशीची पाने, काथ, कापूर आणि वेलची समान प्रमाणात घेऊन त्यात थोडी साखर घालून बारीक मिश्रण करावे. हे मिश्रण दिवसातून दोनदा थोडे खावे. याने फुफ्फुसात जमा झालेला कफ मोकळा होतो.