आरोग्यनामा ऑनलाईन टीम – रात्रपाळीत काम करणाऱ्यांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. रात्रपाळीत काम करणाऱ्यांना बहुधा पचनसंबंधी समस्या जाणवतात आणि वजन वाढतं. त्यामुळे या समस्या दूर ठेवण्यासाठी ,एनर्जी मिळवण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी काही पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. जेणेकरून आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाही. जाणून घ्या नाईट शिफ्टमध्ये कोणते पदार्थ खावेत.
पाणी
शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यास तुम्ही ऊर्जात्मक राहता. त्यामुळे रात्रपाळीत झोप उडवण्यासाठी कॉफी किंवा चहा घेत असाल तर कॉफीचं सेवन टाळा कारण त्यामुळे तुम्हाला जास्त झोप येऊ शकते.
चिकन
आहारात प्रोटिन जास्त असल्यास रात्रपाळीत सुस्ती येत नाही. चिकन हा प्रोटिनचा स्रोत आहे. त्यामुळे रात्रपाळी असल्यास चिकन जास्त प्रमाणात खा.
मासे
काही माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी असिड असतं, जे हृदय आणि मेंदूसाठी चांगलं असतं.
पिनट बटर
रात्री काम करताना तुम्हाला अचानक भूक लागल्यानंतर तुम्ही वजन वाढवणारे असे पदार्थ खाता. असे पदार्थ खाणं टाळायचे असेल, तर एक चमचा पिनट बटर खावं. त्यात फायबर, प्रोटिन आणि हेल्दी फॅट असतं.
फळं आणि भाज्या
फळं आणि भाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. तसंच त्यात फॅट कमी असतं आणि त्यात कोलेस्ट्रॉलही कमी आहे.
विशेष म्हणजे नाईट शिफ्टमध्ये निरोगी खाण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. घरी जेवण तयार करा आणि ते काम करण्यासाठी आपल्यासोबत घेऊन जा. शक्यतो इतर जंक फूड न खावेत.