विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

July 13, 2019
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – देवाला गोड पदार्थांचा नैवेद्य द्यावा. यानंतर देवाचा प्रसाद घेऊन भोजनाची सुरुवात करावी, असे सांगितले जाते. गोड पदार्थाने जेवणाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. आयुर्वेदानुसार गोड पदार्थाने जेवणाची सुरुवात करावी. तर विज्ञानदेखील हेच सांगते. गोड पदार्थांने जेवणाची सुरुवात करणे आरोग्यासाठी चांगले असते.

आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही एक चांगली सवय आहे. जेवणाची सुरुवात गोड पदार्थाने केल्याने इंसुलिन सिक्रेशन होते. आणि जेवण लवकरच पचते तसेच त्यातून ऊर्जा देखील मिळते. चरक संहितेनुसार आयुर्वेदात ६ प्रकारचे रस सांगितले गेले आहेत. यानुसार जेवणाची सुरुवात गोड पदार्थांने करायला हवी. त्यानंतर आंबट, तुरट, कडू आणि मग पुढील भोजन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारते. गोड पदार्थाने केलेल्या जेवणाची सुरुवात पचनक्रियेसाठी उत्तम मानली जाते. यामुळे शरीरातील इतर रसांमधील संतुलन टिकते. आयुर्वेदात गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडु हे सहा रस सांगण्यात आले आहेत.
कोणते फायदे होतात

१) इंसुलिन सिक्रेशन होते
२) जेवण लवकर पचते
३) शरीराला लवकर ऊर्जा मिळते
४) पचनक्रिया सुधारते
५) शरीरातील इतर रसांमधील संतुलन टिकते