‘अ‍ॅल्युमिनियम फॉईल’मध्ये जेवण पॅक करता, तर होऊ शकतात ‘हे’ आजार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  जेवण गरम राहावे म्हणून ते अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक करून घेतले जाते. परंतु अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या वापराने काही गंभीर आजारांचा धोका अधिक असतो.

अ‍ॅल्यूमुनियम फॉईलमध्ये अन्न बांधल्याने होणारे नुकसान –

अ‍ॅल्यूमुनियम फॉईलमध्ये अन्न बांधल्याने अ‍ॅल्युमिनियमचे तत्व त्यात मिसळले जातात. हे शरीराला अपायकारक असतात. याचा थेट परिणाम मेंदूवर देखील होतो. याने अ‍ॅल्झायमरसारखा आजार होण्याची शक्यता असते. तसेच हार्मोनल इम्बॅलन्ससह वाढत्या वयाच्या मुलांना देखील प्रभावित करू शकतात.

आजकाल न्युज पेपर किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये पोळ्या बांधून देण्यापेक्षा फॉईल पेपरमध्ये दिल्या जातात. मात्र हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. अन्न हे प्लास्टिक टिफिनमध्ये देणे देखील टाळावे. काचेच्या किंवा धातूच्या टिफिनचाच वापर अधिक आरोग्यदायी आहे. पाणी देखील धातू किंवा काचेच्या बाटलीत साठवावे.