आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हृदय निरोगी ठेवण्यासाठी फॅटयुक्त जेवणाऐवजी ताजी फळे, हिरव्या भाज्या इत्यादी पौष्टिक खाद्यपदार्थ खावेत. विशेष म्हणजे हृदयाचे आजार असलेल्या रूग्णांनी फॅटयुक्त जेवण टाळले पाहिजे. कारण सॅच्युरेटेड फॅटचा थेट संबंध कोरोनरी हार्ट डिसिजशी असतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
प्लेन ओट्स
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ओट्स उत्तम पर्याय आहे. फ्लेवर्ड ओट्स साखरेमध्ये तयार केले जात असल्याने प्लेन ओट्स खावेत.
मोहरीचे तेल, ऑलिव्ह ऑइल
मोहरीचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल दोन्हीही मोनोसॅच्युरेटेड फॅटचा चांगला स्रोत आहेत. यामुळे कोलेस्टेरॉल आणि ब्लड शुगरची पातळी कमी होते. हृदय रुग्णांनी या तेलांमध्ये शिजवलेले अन्न खावे.
लोह आवश्यक
लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी शेंगा, पालक इत्यादी हिरव्या भाज्या आणि बेदाणे खावेत. लोहाची पातळी पौष्टिक जेवणानंतरही खालावत असेल तर रुग्ण आयर्न सप्लिमेंटचा वापर करावा.
सुकामेवा
बदाम आणि अक्रोडमधील व्हिटॅमिन ई हे एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करते. तर ओमेगा ३ फॅटी अॅसिड हृदयरुग्णांसाठी फायद्याचे आहे.
डाळिंबाचा रस
डाळिंबामधील अँटिऑक्सिडंट, पॉलिफेनॉल्स आणि अँथोसाइआनिन्समुळे आर्टरीज कठीण होत नाहीत. डाळिंबाच्या रसाने हृदयापर्यंतचा रक्तप्रवाह सुधारतो. सफरचंद, केळी, सुद्धा चांगली आहेत.