आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मजबूत शरीरयष्टी, देखणा चेहरा, उजळ त्वचा, कुशाग्र बुद्धी, मजबूत हाडे आणि ठणठणीत प्रकृती यामुळे पुरूषाचे व्यक्तीमत्व आपोआपच रूबाबदार आणि भारदस्त दिसते. परंतु, यासाठी विविध प्रयत्न करूनही अनेकांना योग्य तो बदल दिसून येत नाही. यासाठी काही खास घरगुती उपाय असून त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
करा हे खास उपाय
१. चने आणि गूळ एकत्र करून खा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे त्वचा उजाळते. तुम्ही हँडसम दिसू शकता.
२. चने आणि गुळातील विटॅमिन बी ६ मुळे मेंदूची क्षमता वाढते.
३ चने आणि गुळात भरपूर फॉस्फरस असल्याने दात मजबूत होतात.
४. चने आणि गुळातील पोटॅशियममुळे ह्रदयविकारासारखे आजार दूर राहतात.
५. चने आणि गुळातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.
६. चने आणि गुळात अॅमिनो अॅसिड, सेरेटोनिन असल्याने ताणतणाव कमी होतो. डिप्रेशन दूर होते.
७. चना आणि गूळाील प्रोटिन्समुळे मांसपेशी मजबूत होतात.
८. चना आणि गूळातील जिंकमुळे चेहरा चमकदार होतो.
९. चना आणि गूळ खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढून लठ्ठपणा कमी होतो.
१०. चना आणि गूळात फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते. पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात.