आरोग्यानामा ऑनलाइन टीम : शरीरावर अतिरिक्त चरबी वाढल्याने आपोआपच वजन वाढते. ही चरबी कमी करण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार घेणे आवश्यक असते. मात्र, दोन्ही सोबत काही खास घरगुती उपाय केल्यास लठ्ठपणा लवकर कमी होण्यास मदत होऊ शकते. हा उपाय करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. या उपायाविषयी आपण जाणून घेणार आहोत.
असा करा उपाय
१ प्रथम तुरटी २ चमचे, विक्स २ चमचे, बेकिंग सोडा १ चमचा आणि प्लास्टिक टेप घ्या.
२ तुरटी मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. तुरटीच्या पावडरमध्ये बेकिंग सोडा आणि विक्स मिसळून एकजीव करा.
३ ही पेस्ट चरबी असलेल्या पायांना, हातांना अथवा पोटाला लावा.
४ पेस्ट लावलेल्या भागावर प्लास्टिक टेपने बांधा. ही पेस्ट किमान दोन तास तशीच ठेवा.
५ हा उपाय किमान एका आठवडा करा. यामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी नष्ट होते.
सुरकुत्याही होतील दूर
सुरकुत्या दूर करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. तुरटीचा तुकडा पाण्यात बुडवून हलक्या हाताने चेहऱ्याला लावा. हे पाणी सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे सुरकुत्या कमी होतात.
Visit : arogyanama.com