आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणा ही सध्या सर्वाधिक भेडसावणारी आरोग्य समस्या आहे. जीवनशैलीशी संबंधीत या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेकजण उपाशी राहतात, तर काहीजण व्यायाम करतात. परंतु, यापैकी खुप कमी लोकांना वजन कमी करण्यात यश येते. यासाठी वजन कमी करण्यासाठी योग्य पद्धत खुप आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी कोणते मार्ग निवडावेत, हे जाणून घेवूयात.
हे आवश्य करा
१. वजन कमी करण्याच्या ध्येयासाठी प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टींचा शोध घ्या.
२. नेहेमी पॉझिटिव्ह विचार करा. शिस्त, पेशन्स आणि कठोर परिश्रम घ्या.
३. काकडी आणि लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहू शकते.
४. नियमित व्यायाम करा. आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य आहार घ्या.
५. व्यायाम करणे तुम्हाला शक्यच नसेल, अथवा तशी मानसिकताच नसेल तर सरळ डाएटचा मार्ग निवडा.
६. जर तुम्हाला आहारातील पदार्थांवरील बंधने अशक्यच असतील आणि व्यायाम करणे सहज, सोपे वाटत असेल तर डाएटच्या फंदात जास्त पडू नका.