आरोग्यनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीमला जातात. तसेच आहार कमी करतात. परंतु, आहार कमी करणे चुकीचे आहे. वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कॅबेज सूप डाएट प्लॅन बेस्ट असून यामुळे फक्त ७ दिवसांमध्ये ४ किलो वजन कमी होऊ शकते. ७ दिवसांच्या या डाएट प्लॅनमध्ये प्रत्येक दिवसाला वेगळे डाएट असले तरी कॅबेज सूप दररोज घ्यायचे आहे. हा डाएट प्लॅन कसा फॉलो करायचा याविषयी जाणून घेवूयात.
कॅबेज सूपची सामग्री
* सह मोठ्या आकाराचे कांदे कापलेले
* दोन कापलेल्या शिमला मिरच्या
* तीन गाजर कापलेले
* चार टोमॅटो
* ओव्याचे पत्ते
* अर्धी कापलेली पत्ताकोबी
* पाव किेलो मशरूम
* लसून पावडर
* चवीनूसार मीठ
असे तयार करा सूप
प्रथम मध्यम आचेवर कांदा ४ ते ५ मिनिटे भाजून घ्या. नंतर त्यात शिमला मिरची टाका. पत्ताकोबी, गाजर, मशरूम आणि ओव्याचे पत्तेही त्यामध्ये टाका. नंतर टोमॅटो टाका. शेवटी यामध्ये १२ कप पाणी टाकून भांडे झाकून ठेवा. जोपर्यंत सर्व भाज्या व्यवस्थितपणे शिजत नाही तोपर्यंत शिजवा.
पाहिला दिवस
केवळ सूप प्या व फळे खा. केळी सोडून इतर सर्व फळे खावू शकता. बिनसाखरेचा चहा पिऊ शकता.
दुसरा दिवस
सुपसोबत हिरव्या पालेभाज्या खा. वटाणे, मका, ड्राय बीन्स खावू नका. डिनरमध्ये बटरसोबत एक उकडलेला बटाटा खा.
तिसरा दिवस
पहिला आणि दुसरा दिवसाचे कॉम्बिनेशन घ्या. सुप, फळे आणि भाज्या खा. आज बटाटा खावू नका.
चौथा दिवस
केळी आणि फॅट नसलेले दुध घ्या. शक्य तेवढी केळी खा. साय काढलेले दुध हवे तेवढे पिऊ शकता.
पाचवा दिवस
२५० ग्रॅम बटाटे आणि ६ ताजे टोमॅटो खा. बटाटा उकडून अथवा भाजूनही खाऊ शकता.
सहावा दिवस
पोट भरून हिरव्या पालेभाज्या खा. कमीत कमी एकवेळ सुप प्या.
सातवा दिवस
पोटभर ब्राउन राईस खा. ताज्या फळांचा रस आणि हिरव्या पालेभाज्या खा. कमीत कमी एक वेळ सुप प्या.
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या