मुल होण्यासाठी ‘फॉलीक अॅसिड’ महत्वाचं, करा ‘या’ 9 पदार्थांचं सेवन !
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – संतांनप्राप्तीसाठी अनेक जोडपे प्रयत्न करत असतात . परंतु लो फर्टिलिटीमुळे संतानसुखापासून लांब राहावे लागते. त्यामुळे त्याचा सेक्स लाइफवर परिणाम होतोच शिवाय नैराश्य देखील येते. फर्टीलिटीची क्षमता वाढवण्यासाठी जीवनशैली आणि खानपानामध्येदेखील काही बदल करणे आवश्यक आहे . फॉलीक अॅसिड म्हणजे बी व्हिटॅमिन युक्त पदार्थांचे सेवन केल्याने फर्टीलिटीची समस्या कमी होते. जाणून घ्या फॉलीक अॅसिडबद्दल
पुरुषांमधील फॉलीक अॅसिडची कमी
पुरुषांमध्ये फॉलीक अॅसिडची कमी आल्याने स्पर्ममध्ये डीएनए स्टॅबिलिटी कमी होते. फॉलिक अॅसिड सेल डिव्हिजन आणि डीएनए निर्मिती मध्ये मदत करतात.
महिलांमधील फॉलीक अॅसिडची कमी
महिलांमधील फॉलीक अॅसिडची कमी संततीच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करू शकते. गर्भधारणेपूर्वी आणि नंतर फॉलीक अॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा न्यूरल ट्युब मध्ये दोष निर्माण होऊ शकतो. तसेच बाळामध्ये गंभीर आजार जन्मतः उद्भवू शकतात.
फॉलिक अॅसिडसाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
बादाम
एव्होकाडो
पालक
संत्री
भात
ब्रसेल्स स्प्राउट्स
ब्रोकली
पोपई
शेंगदाणे
Comments are closed.