आरोग्यनामा ऑनलाइन – पाच वर्षांपर्यंत तुमचं बाळ अंथरूण ओलं करत असेल तर हे सामान्य आहे. मुलांना अशी सवय असेल तर पालकांनी त्यांना न ओरडता त्यांच्याशी सकारात्मक भावनेने वागलं पाहिजे. आपल्याकडे सर्रास लहान बाळाच्या गादीवर प्लॅस्टिक टाकलं जातं. जेणेकरून बाळाने सू केली तरी गादी ओली होऊ नये, असा यामागील हेतू असतो. बाळ जसजसं मोठं होतं तसतसं ही सवय कमी होत जाते. काही मुलं तर सु qकवा शी आली की आईला सांगातात. मग आई त्यांना सू साठी घेऊन जाते. परंतु, अनेकदा कही मुलं मोठी झाली तरी बिछान्यात सू करतात. यामुळे आई वडील टेन्शन घेतात.
मुळात पाच वर्षांपर्यंतच्या मुलाने अंथरूणात लघवी करणे हे सामान्य आहे. सतत लघवीला जाण्याची सवय असणं या गोष्टींमुळे लहान मुलं अंथरूण ओलं करतात. ही सवय असणाऱ्या अनेक मुलांना पालक डॉक्टरांकडे घेऊन जातात. डॉक्टर अशा मुलांवर टप्प्याटप्प्याने उपचार करतात. पालकांनाही काही सूचना देतात. त्याप्रमाणे पालकांना काळजी घ्यावी लागते. जी मुलं रात्री अंथरूण ओलं करतात त्यांच्या पालकांना झोपण्याच्या २ तास अगोदर मुलांना पाणी न देण्याचा सल्ला दिला जातो. जर मूल रात्री लघवी करत असेल तर पालकांनी मूल झोपण्याच्या नंतर त्या वेळेचा अंदाज घ्यावा. त्यानंतर खास अलार्म लावून त्याचवेळी मुलाला उठवून लघवी करून येण्यास सांगावे. अशाप्रकारे काळजी घेऊनही मुलावर चांगला परिणाम झाला नाही तर मुलांना गोळी दिली जाते. ज्यामुळे मुलं अंथरूण रात्रीच्या वेळी ओलं करत नाहीत. परंतु, गोळी देण्याचा हा उपचार फार क्वचित केला जातो.
संध्याकाळी सहा नंतरचं मुलांचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी करावं. यावेळी शक्यतो २५० ते ३०० लीटर पाणी पिणं द्यावं. लघवी करून आल्यानंतर मुलाला पुन्हा लघवी करायला सांगणं. अनेकदा मुलांच्या मूत्राशयात लघवी केल्यानंतरही काही प्रमाणात लघवी साठलेली असते. आणि या लघवीमुळे मूल अंथरूण ओलं करू शकतं. मुलांना रात्री अंथरूण कोरडं ठेवण्याचा सकारात्मक संकल्प करायला सांगायचा. रात्री अंथरूण ओलं करणार नाही अशा नकारात्मक गोष्टी त्यांना मनात आणू देऊ नका. झोपल्यानंतर चार तासांनी मुलांना पुन्हा एकदा लघवीला न्यावं. मूल रात्री अंथरूण ओलं करत असेल तर याविषयी त्याला रागवू नये तसंच वारंवार याविषयीची चर्चा करू नये. रात्रीच्या वेळेस अंथरूण ओलं करण्याची सवय ५-१५ वयोगटातील मुलांमध्ये होते. पाच वर्षांअगोदर अंथरूण ओलं करणाऱ्या मुलांना उपचारांची गरज नसते. मात्र पाच वर्षांनंतर आठवड्यातून दोनदा सलग तीन महिने जर मूल अंथरूण ओलं करत असेल तर डॉक्टरांकडे जायला हवं