आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनियमित लाईफस्टाईलमुळे पुरूषांमध्ये कमजोरी येते. त्यामुळे त्यांना शुक्राणू वाढवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र असे अनेक फूड आहेत ज्याच्या खाण्यामुळे तुमच्या शरीरातील शुक्राणूमध्ये वाढ होऊ शकते. सध्या असे अनेक लोक आहेत की त्यांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी असल्यामुळे काही लोकांना एकही आपत्य नाही. त्यामुळे तुमच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल तर तुम्ही खालील उपाय फॉलो करून तुमच्या शरीरातील शुक्राणू वाढू शकता.
१) चॉकलेट :
चॉकलेट न आवडणारी एकही व्यक्ती आपल्याला या पृथ्वीतलावावर दिसणार नाही. मात्र पुरूषांच्या शुक्राणूमध्ये वाढ करण्यासाठी डार्क चॉकलेट कायम फायदेशीर असते. डार्क चॉकलेटमुळे लगेच शरिरात एनर्जी निर्माण होते.
२) खारका :
खजूर खाल्यामुळे देखील स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते. त्यामुळे याला दररोज आपल्या आहारात समाविष्ट करून घ्या. जेणे करून उत्तम सेक्सचा आनंद तुम्ही चिरंतर घेऊ शकता.
३) भोपळ्याच्या बिया :
त्याचसोबत भोपळ्याच्या बिया देखील तुम्ही खाऊ शकता. जेणे करून तुमचा स्पर्म अकाऊंट वाढू शकतात. याला देखील तुम्ही दररोज जेवणात वापरू शकता.
४) गाडी चालावणे टाळा :
सायकल चालवणे हे आरोग्यसाठी चांगले असते पण जेव्हा शुक्राणूंची गोष्ट येते तेव्हा जरा सांभाळून. प्रदीर्घ काळ आपण बाईक चालविल्यास तुमच्या शुक्राणूची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल तर गाडी चालवणे कमी करा.
५) लाल फळे खा :
तुम्ही जर लाल रंगाचे पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीरातील शुक्राणूंची क्षमता, वहन आणि संख्या झपाट्याने वाढते. शुक्राणूच्या संख्येत ७० टक्क्यांनी वाढ होते. लायकोपेन आपल्याला लाल रंगाची फळे, भाज्यामध्ये मिळते. यात टोमॅटो, स्ट्रॉबेरी, चेरी लायकोपेनचे प्रमाण अधिक असते.त्यामुळे या फळांचा तुमच्या आहारात समावेश करा.