आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नियमित सीताफळ खाल्ल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात. यामधील अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशियम आरोग्यासाठी लाभदायक आहेत. परंतु, हे जास्त खाल्ल्याने नुकसान सुद्धा होऊ शकते. सिताफळाचे ५ फायदे आणि दुष्परिणामांविषयी माहिती घेवूयात.
हे आहेत फायदे
१ यामध्ये प्रोटीन्स आणि कॅल्शियम भरपूर असल्याने हाडे आणि मसल्स मजबूत होतात.
२ याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते. कमजोरी दूर होते.
३ यातील पोटॅशियममुळे हृदयरोगांपासून बचाव होतो.
४ केस काळे, दाट आणि लांब होतात. शिवाय त्वचा उजळते.
५ यातील फॉस्फरसमुळे दात मजबूत होतात. गम प्राब्लेमपासून बचाव होतो.
हे होतात दुष्परिणाम
१ यात हाय कॅलरीज आणि साखर असते, यामुळे वजन वाढू शकते.
२ यातील फायबरमुळे अपचनाचे त्रास होऊ शकतात. अॅसिडिटी होते.
३ याच्या सेवनाने शुगर वाढते. डायबिटीजच्या रूग्णांनी हे फळ खाऊ नये.
४ यातील आयर्नमुळे बध्दकोष्ठता वाढू शकते.