‘हे’ आसन केल्याने पोटाची चरबी होईल कमी, जाणून घ्या ७ फायदे

‘हे’ आसन केल्याने पोटाची चरबी होईल कमी, जाणून घ्या ७ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : चुकीच्या जीवनशैलीमुळे पोटात गॅस, अ‍ॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या अनेकांना सतावते. वेळी, अवेळी खाणे, झोपेचा अभाव, जागरण आदी कारणांमुळे हा त्रास जास्त होतो. यावर पवन मुक्तासन हा खुप चांगला उपाय आहे. परंतु, गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच गरोदर स्त्रियांनी हे आसन करू नये.

हे आहेत फायदे
१ पोट व ओटीपोटावरील चरबी घटते.
२ नितंबांच्या सांध्यांना जास्त रक्तपुरवठा होतो.
३ पाठीच्या खालील भागावर पडलेला ताण नष्ट होतो.
४ पाठीच्या खालच्या भागातले स्नायू बळकट होतात.
५ गॅसेसचा त्रास कमी होतो.
६ पचन व उत्सर्जन व्यवस्थित होते.
७ पोटात होणारा रक्तसंचय दूर होतो.

असे करा आसन
एका बाजूने वळून पाठीवर विश्राम अवस्थेत झोपा. दोन्ही हात एकमेकांजवळ आणा. शरीराशेजारी ठेवा. दोन्ही पाय गुघड्यात मोडून तळवे जमिनीवर ठेवा. गुडघ्यात दुमडलेले पाय हळूहळू छातीजवळ आणा. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करुन दोन्ही गुडघे पकडून छातीवर दाब आणा. नैसर्गिकरित्या श्वास सुरू ठेवा. डोके वर उचवून हनुवटी गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. क्षमतेनुसार या स्थितीत रहा. यातून बाहेर येताना डोके जमिनीवर ठेवा. हातांची पकड सैल करा. पायांचे तळवे जमिनीवर आणा. पाय सरळ करुन जमिनीवर ठेवा. विश्राम अवस्थेत या. याची दोन ते तीन आवर्तने करा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु