आरोग्यनामा ऑनलाईन-ज्या लोकांची बॉडी फिटनेस(Fitness) चांगली असते, ते अधिक आनंदी असतात. कारण त्यांच्यामध्ये मानसिक तणावाची पातळी इतर लोकांच्या तुलनेत खूप कमी असते. असे एका कारणामुळे नाही तर अनेक कारणांमुळे होत असते. जसे की वाढलेला आत्मविश्वास, कोणत्याही कपड्यांवर परफेक्ट लुक दिसणे इ. चला तर मग आज जाणून घेऊया की कशा पद्धतीने परफेक्ट फिगर प्राप्त होऊ शकते आणि त्यास कसे मेंटेन ठेवले जाऊ शकते.
आज आपण अशा सोप्या पद्धतीबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे आपण आपल्याला आवडेल अशी फिगर मिळवू शकता आणि त्यास मेंटेन देखील ठेऊ शकता. ही पद्धत इतकी सहज आणि सोपी आहे की आपल्याला वाटेल की कुठलीही कसरत न करता इतके गोड फळ चाखायला मिळत आहे तर दुसऱ्या झंझट मध्ये का पडायचे.
सर्वात आधी तणावामुळे लठ्ठपणा वाढतो आणि नंतर लठ्ठपणामुळे ताणतणाव वाढतो. अशा प्रकारे ते एक चक्र बनते आणि दोन्ही गोष्टी एकमेकांना वाढविण्याचे कार्य करतात. म्हणजेच तणावमुळे लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणामुळे तणाव वाढतो…
बडीशेपची चव दूर करेल लठ्ठपणाचा ताण
– लठ्ठपणा कमी करण्यासाठी बडीशेपचे बियाणे आपल्याला खूप मदत करू शकतात. बडीशेपचे बियाणे म्हणजेच किराणा दुकानात मिळणारी कोरडी बडीशेप होय, जिला साखर कॅन्डी बरोबर खाल्ले जाते. या बडीशेपमुळे लठ्ठपणा दूर होतो.
– बडीशेपच्या बियाण्यांचा चहा बनवा आणि दिवसातून दोनदा वापरा. चहा बनवण्यासाठी एक कप गरम पाण्यात एक छोटा चमचा बडीशेप टाका आणि एक चमचा साखर टाका, तसेच 1 हिरवी वेलची कुटून टाकावी.
– त्यास 2 ते 3 मिनिटे उकळवा आणि उकळल्यावर गॅस बंद करा. या चहाचे सेवन केल्याने आपला लठ्ठपणा कमी होईल आणि फिटनेस वाढेल.
बडीशेपच्या पावडरचे सेवन
बडीशेपला लोखंडी कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्या. जेव्हा ते थंड होईल तेव्हा त्यात थोडी साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवून घ्या. या पावडरचे सेवन जेवण झाल्यानंतर करावे, दिवसातून दोन वेळा 1-1 चमचा पावडर घ्यावी. ही पावडर गरम पाण्याबरोबर घ्यावी. यामुळे आपल्याला अपचन, गॅस आणि मोशन संबंधी समस्या उद्भवणार नाही. पाचक प्रणाली अधिक चांगले काम करेल आणि लठ्ठपणा कमी होईल.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.