आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील सेलेब्रेटी नेहमीच आपल्या फिटनेसविषयी जागरूक असतात. त्यांच्या फॅन्सनाही त्यांची लाईफस्टाईल जाणून घेण्याबद्दल आकर्षण आणि उत्सुकता असते. आज आपण अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या फिटनेसचे सीक्रेट जाणून घेणार आहोत.
जॅकलीन फर्नांडिस बॉलीवूड मधील एक ‘फिट आणि फाईन’ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘योग्य प्रमाणात व्यायाम, योगासने आणि डाएट’ हा तिचा फिटनेस मंत्र आहे. ती एक्सरसाईझसोबतच भरपूर पाणी पिणे आणि प्राणायमालादेखील तेवढेच महत्त्व देते. ती सकाळी ७ वाजता उठते. कोमट पाणी आणि मध किंवा लिंबू घेऊन ती दिवसाची सुरुवात करते. त्यानंतर योगासन व स्ट्रेचिंग करते. नाश्त्यामध्ये ती उकडलेले अंडे, ताजी फळे आणि ग्रीन टी घेते. दुपारच्या जेवणात ब्राऊन राइस आणि खूप प्रमाणात सलाड खाते. रात्री शक्यतो भूक असल्यासच खाते किंवा हलके जेवण घेते. विशेष म्हणजे तिच्या जेवणात साखर पूर्णपणे वर्ज आहे.
स्टॅमिना वाढविण्यासाठी कार्डिओ आणि लाइट वेट ट्रेनिंगही घेते. वर्कआऊट करून आल्यानंतर प्रोटिन शेक घेते. योगासने हा तिचा आवडता प्रकार आहे. फिटनेससाठी ती स्विमिंगलाही प्राधान्य देते. तसेच मनशांती मिळवण्यासाठी ती ध्यान आणि प्राणायमालादेखील करते. खूप जास्त वर्कआऊट आणि खूप जास्त डाएट यावर तिचा विश्वास नाही. चॉकलेट आणि पिझ्झा तिच्या आवडीचे पदार्थ आहेत. योग्य खा, योग्य झोप घ्या, आणि रोज व्यायाम करा हे तिचे दैनंदिन जीवनाचे सूत्र आहे.