आरोग्यनामा ऑनलाइन टीम – साधारणपणे महिलांना ३५ ते ५० या वयात फायब्रॉइड हा आजार होऊ शकतो. महिलांच्या गर्भाशयातील गाठीला फायब्रॉइड म्हणतात. ही गाठ मुगासारखी लहान अथवा टरबूजाएवढी मोठी सुद्धा असू शकते. ही समस्या होण्यामागे अनेक कारणे असतात. हा आजार असलेल्या महिलेला अनेक आरोग्य समस्या होतात. म्हणून या आजाराचे संकेत वेळीच ओळखून उपचार करणे गरजेचे असते. या आजाराच्या संकेतांविषयी जाणून घेवूयात.
हा आजार का होतो?
वाढते वय, प्रेग्नेंसी, लठ्ठपणा, हार्मोनेल चेंज अथवा जेनेटिक प्रॉब्लेममुळे हा आजार होऊ शकतो.
हे आहेत संकेत
१ नाभीच्या खालच्या पोटात वेदना होणे
२ पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे
३ वारंवार युरिन येणे
४ पीरियड्सच्या काळात वेदना होणे
५ एनीमियाची समस्या असणे
६ दिर्घकाळ बद्धकोष्ठतेची समस्या असणे