आरोग्यनामा ऑनलाईन टीम – उच्च रक्तदाबाचे वेळेत उपचार करणे गरजेचे आहे. याचे लवकर उपचार केले नाही तर हृदयाची समस्या वाढत जातात. आपल्याला ब्लड प्रेशरला कमी करण्यासाठी नेहमीच औषध घेणे हे योग्य नाही. याउलट काही चांगल्या गोष्टी करण्याची आवश्यकता असते. औषधांचा अनेक काळ उपयोग केल्याने अन्य वेगळ्या रोगांचा सामना करावा लागतो. जीवनात आपण आपल्या ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवू शकतो पण यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. असे काही आवश्यक तत्व आहे जी आपल्या ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवण्यास मदत करु शकतात. फायबरयुक्त जेवणाने ब्लड प्रेशर कमी करु शकतो. कोणकोणत्या भाज्या आणि फळांमध्ये फायबर आहे ते जाणून घेऊया…
फायबर फूडचे स्त्रोत
अनेक खाद्य पदार्थ आहे ज्यामध्ये फायबर आहे. तुम्ही तुमच्या आवडीनूसार फायबर स्त्रोतची निवड करु शकतात. जास्तकरुन फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये अधिक फायबर असते.
भाज्या
अनेक भाज्यांमध्ये फायबर असते. अनेकदा ज्या भाज्यांमध्ये फायबर असते. त्या भाज्या खाण्याचा अनेकदा डॉक्टर सल्ला देतात. भाज्यांमध्ये भोपळा, गाजर, पालक, स्वीट कॉर्न, ब्रॉकली, बटाटा, कोबी या भाज्या खाल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवता येते.
फळे
ताज्या फळे आपण दिवसातून कधीही खावू शकता. आपल्या आवडीच्या फळांची निवड करुन ते तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता. ज्या फळांमध्ये फायबर असते उदा. केळ, स्टॉबेरी, आंबा फळे तुम्ही खाऊ शकता.
मेवा आणि बिया
अक्रोडमध्ये फायबर आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. मुठभर शेंगदाणे ही भुकेवर चांगला पर्याय आहे. शेंगदाण्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. बियांमध्ये बदाम, सब्जा ( तुळस बी), क्विनोआ, भोपळ्याच्या बिया यांचा समावेश होतो.