आरोग्यनामा ऑनलाइन टीम – धावपळीच्या आणि स्पर्धेच्या या युगात मानसिक ताणतणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कामातून वेळसुद्धा मिळेनासा झाला आहे. परंतु, मानसिक ताण आणि वेळेचा अभाव हे दुष्टचक्र भेदायचे असेल तर अवघ्या काही मिनिटांचा वेळ तुम्हाला काढावाच लागेल. कारण अगदी काही मिनिटांचा व्यायाम तुम्ही नियमित केला तर तुम्ही टेन्शनमुक्त होऊ शकता.
काही मिनिटांच्या व्यायामाचे फायदे
१) टेन्शन कमी होतं.
२) मसल्स रिलॅक्स होतात.
३) शांत झोप लागते.
४) भविष्यातली आव्हाने झेलण्यास व्यक्ती सज्ज होतो.
५) टेन्शन्स घेण्याची क्षमता वाढते.
६) आरोग्य सुधारते.
७) चिंता, नैराश्य दूर पळते.
८) ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
९) हृदयविकाराचा धोका कमी होतो.
१०) डायबेटिससारखे आजार लांब राहातात.
११) पाठीचे दुखणे दूर जाते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)