१) लहान मुलांनी एखादा पदार्थ खाल्ला नाही, तर काही आठवडे तो पदार्थ त्याला खायला देऊ नका. आणि त्याला पुन्हा तो पदार्थ खायला देतांना तो वेगळ्या स्वरूपात द्यावा. त्यांना पालेभाजी आवडत नसेल, तर पालक, मेथी घालून परोठे करून द्या. किंवा अशा भाज्या घालून त्यांना घावन करून खायला द्या.
२) दिवसभराच्या दोन जेवणांच्या मधल्या वेळेत जर लहान मुलांना खाऊ खावासा वाटला.
३) जेवणाच्या वेळी सभोवतालचे वातावरण प्रसन्न असले पाहिजे.
४) जेवणाकडे दुर्लक्ष होऊ नये; म्हणून मुलांच्या जवळ खेळण्यासारख्या वस्तू ठेवू नयेत.
५) मूल जेवत असतांना स्वतःच्या आवडीनिवडीची चर्चा करू नये.
६) जेवतांना त्याचे प्रगतीपुस्तक, खोड्या किंवा चुका यांविषयी चर्चा करू नये.