पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – पावसाळा सुरु झाला कि, वातावरणात बदल होतो. कधी खूप ऊन, कधी पाऊस तर कधी लगेच थंडी या बदलत्या वातावरामुळे लहान मुलांनमध्ये सर्दी, खोकला, ताप या साथीच्या रोगाचे प्रमाण वाढते. कधी ताप कमी होतो. तर कधी खूप जास्त आणि प्रत्येकवेळी रुग्णालयात जाणे शक्य होत नाही. अशावेळी आपण काही नैसर्गिक उपाय करणे गरजेचे असते.
*ताप कमी करण्याचे उपाय खालील प्रमाणे *
१) कांदा हा ताप कमी करण्याचा सर्वात्तम उपाय आहे. कारण, कांदा शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे वेदनाही कमी होतात. यासाठी फक्त कांद्याचे बारीक तुकडे करावेत. आणि काही मिनिटे आपल्या मुलांच्या पायांवर २ ते ३ तुकडे घालावेत. ताप कमी करण्यासाठी ही प्रक्रिया तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता.
२) लिंबू आणि मधाचे मिश्रण हा ताप कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. लिंबातील व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत करते. मध आपल्या शरीराला पोषण देते.
३) अंडे हे पण ताप कमी करू शकते. अंड्याच्या पांढऱ्या भागाचे ३ चमचे घ्या. आणि एका लहान बाऊलमध्ये चांगले फेटून घ्या. त्यात कापडाचा एक स्वच्छ तुकडा थोडावेळ भिजवून घ्या. नंतर ते कापड मुलाच्या पायावर घाला. आणि एका तासासाठी ते तसेच ठेवा. हे शरीराचे तापमान कमी करते.
४) अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म असल्यामुळे मनुक्यामुळे ताप कमी होतो. आपण १ / २ कप पाण्यात साधारण २५ मनुके एक तासासाठी भिजत घालू शकता. मनुके मऊ झाले की थोडे क्रश करून घ्या. त्यातील पाणी काढून टाका. आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस त्यात घाला. हे मिश्रण बाळाला दिवसातून दोन वेळा द्या. असे केल्याने ताप कमी होण्यास मदत होईल.
५) आल्यामध्ये तापासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूंना नष्ट करण्याची क्षमता आल्यामध्ये असते. तसेच शरीरातील उष्णता आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. गरम पाण्याने भरलेल्या टबमध्ये २ चमचे आलं पावडर घाला. पावडर घालून चांगले हलवा. त्याने मुलाला अंघोळ घाला. उष्णता कमी होण्यास मदत होईल.