आरोग्यनामा ऑनलाईन- मेथीदाणे(fenugreek) आरोग्यासाठी खुप लाभदायक आहेत. मेथीदाण्यात अँटी ऑक्सीडेंट्स आणि सूज राखणारे गुण आहेत. केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी हे उपयुक्त आहे. जर तुम्हाला मेथीदाणे(fenugreek) रोजच्या जेवणात वापरायचे नसतील तर ते वापरण्याच्या वेगळ्या पद्धती सुद्धा आहेत. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेथी पाण्याचे सेवन करावे. मेथी पाणी घरी सहज तयार करता येते.
असे तयार करा मेथी पाणी
कोणत्याही कढईत मेथीदाणे टाका. यानंतर गॅसवर ठेवून दोणे भाजून घ्या. भाजल्यानंतर त्यांची पावडर तयार करा. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मेथीदाणे पावडर मिक्स करा. आता तुमचे मेथी पाणी तयार झाले. आरोग्याचे फायदे मिळवण्यासाठी रोज सकाळी हे पाणी प्या.
मेथी पाणी पिण्याचे फायदे
1 दिवसभर उर्जा मिळते.
2 वजन नियंत्रणात राहाते.
3 पोट भरलेले वाटत असल्याने जास्त कॅलरीज सेवन केल्या जात नाहीत.
4 ब्लॉटिंगपासून दिलासा मिळतो.
5 केसांच्या वाढीसाठी लाभदायक.
6 केसातील डँड्रफ, कोरडेपणा दूर होतो.
7 शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.
8 अपचनाची समस्या दूर होते.
9 डायबिटीजमध्ये लाभदायक आहे. ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहाते.
10 किडनीचे आरोग्य वाढते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.