आरोग्यनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात बाहेर फिरणे म्हणजे खूपच त्रासदायक असते. त्यातच अति उन्हामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. उष्माघातासारखा त्रास झाल्यास जीवदेखील जाण्याची शक्यता असते. अशावेळी उन्हापासून बचाव करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत.
त्यापैकी महत्वाचे उपाय आपण जाणून घेणार आहोत. दररोज उपाशीपोटी बडीशेपचे पाणी पिणे प्रत्येक ऋतुमध्ये अत्यंत फायदेशीर असते. उन्हाळ्यात हे पाणी प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो. बडीशेपच्या दाण्यांमध्ये डाययुरेटिक गुण असल्याने या पाण्याने युरीनसंबंधी समस्या दूर होतात. निर्विषीकरणातही ते मदत करतात.
नियमितपणे हे पाणी प्यायल्याने यकृताशी संबंधित रोग दूर होतात. बडीशेपपासून तयार केलेले पाणी थंड असते. यात वेलची पावडर टाकून पिल्याने उन्हापासून बचाव होतो. या पाण्यात काळे मीठ टाकून पिल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. बडीशेपच्या पाण्यात एक चमचा मध टाकून रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन झपाट्याने घटते.
यामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. बडीशेपच्या पाण्याच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत मिळते. बडीशेपचे पाणी बनविण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात बडीशेप टाका आणि रात्रभरासाठी झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे.