आरोग्यानामा ऑनलाईन टीम : थकवा येण्यामागे विविध कारणे असतात. काहींना सतत थकव्याचा त्रास जाणवतो. मात्र, याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अन्यथा अनेक समस्या निर्माण होतात. सतत येणारा थकवा दूर करण्याचे काही खास घरगुती उपाय असून ते केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय
१ सकाळी लवकर उठून थोडा वेळ व्यायाम करा.
२ आंघोळीला योग्य वेळ द्या. थंडीचे दिवस सोडून इतर दिवशी थंड पाण्याने आंघोळ करा.
३ आहारात पोषक तत्व राहतील याची काळजी घ्या. आयर्न, प्रोटीन आणि फायबर युक्त आहार सेवन करा. फळे खा.
४ फळांचा ज्यूस सेवन करा. फळे खा. यामुळे एनर्जी मिळेल. लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचा ज्यूस घ्या.
५ चॉकलेट खाल्यास फायदा जाणवेल. मानसिक शांतता मिळते.
६ शरीराला आवश्यक तितके पाणी रोज प्या.
७ झोपण्यासाठी योग्य तो वेळ द्या. यामुळे थकवाही दूर होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
Visit : arogyanama.com