आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे सर्वच वयोगटात ही समस्या दिसून येत असून हा एक प्रकारचा आजार असल्याचे म्हटले जाते. लठ्ठपणाची समस्या असलेल्या व्यक्तीस इतर आजारही होण्याचा धोका वाढत असतो. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब, हृदयरोग, मुधमेह हे आजार होताता. तत्ज्ञांना असेही दिसून आले आहे की, लठ्ठपणामुळे पुरूषांची यौन क्षमता कमी होते.
हे आहेत परिणाम
१) लठ्ठ व्यक्ती प्रणय करताना लवकर थकतात.
२) सेक्सदरम्यान ते अपेक्षित आनंद घेऊ शकत नाहीत.
३) पार्टनरलाही संतुष्ट करु शकत नाहीत.
४) यामुळे ते पार्टनरपासून दूर राहू लागतात.
५) हार्मोन्सच्या असंतुलनामुळे लठ्ठपणा वाढतो.
६) लठ्ठपणाचा संबंध सेक्स हॉर्मोनशी आहे. पुरुषात टेस्टोस्टेरोनच्या कमतरनेने ७ सेक्ससंबंधी समस्या निर्माण होते. यामुळे सेक्सची इच्छा कमी होते.
७) लठ्ठ मुले एकटे राहू लागतात आणि डिप्रेशनच्या समस्येने ग्रस्त होतात.
८) लठ्ठपणामुळे पुरुषात इंफर्टिलिटीची समस्या निर्माण होते.
९) लठ्ठपणामुळे डायबिटीज, ह्रदयरोग आदी आजार होतात.
१०) या आजारावरील औषधांमुळे सेक्स क्षमतेवर विपरित परिणाम होतो.